दहा शेतकऱ्यांनी प्रत्येकी अर्धा एकर ऊसाची लागवड केली आहे. त्यातून ते ऊसापासूनचे उपपदार्थ बनवत आहेत. ऊसाचा रस फ्रोजन करुन ठेवला जातो. जर ऊस कारखान्याला दिला असता तर टनाला 2 ते 3 हजार रुपये मिळाले असते परंतु त्यांना कुल्फी बनवल्या नंतर त्यांना 15 हजार रुपये प्रति टन दर मिळतो आहे.
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ऊसापासून बनवलेली कुल्फी ही ग्राहकांच्या पसंतीस उतरते आहे. दररोज 1000 ते 1200 कुल्फी विकल्या जातात. अष्टविनायक रस्त्यालगत आऊटलेट असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आहे. ऊसाची कुल्फी पहिल्यांदा पाहिल्याने लोक इथे थांबत आहेत. ऊसापासूनची कुल्फी ही आरोग्यदायी असल्याचे सांगत आहेत. थंड कुल्फी खाल्ल्याने आरोग्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच कुल्फीची किंमत देखील फक्त 10 रुपये आहे. यासाठी लागणारी मशनिरी ही मुंबई आयआयटीमधून आणण्यात आली आहे. ऊस बाहेर ठेवला तर अर्ध्या तासात काळा पडतो परंतु ही कुल्फी 6 महिने टिकते. ग्रुपमधील शेतकऱ्यांना रोजचे हजार रुपये मिळत आहेत. अनेकदा ऊस कारखान्याला जात नाही म्हणून शेतकरी ऊस पेटवून कारखान्याला घालवतात. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होतं. शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील आलेगाव येथील शेतकऱ्यांचा आदर्श घेतला तर अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल यात शंका नाही.
पर्याय खूप आहेत, फक्त धंद्यात उतरणे गरजेचे आहे.
उद्योजक आयडिया पैशाचे ज्ञान यासाठी subscribe youtube channel - IcoNikAkki
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें