नेपोलियन बोनापार्ट
गोष्ट आहे महान ऐतिहासिक पुरुष व अतिशय चातुर्य असलेल्या राजा नेपोलियन बोनापार्टची.नेपोलियन त्या काळात अतिशय प्रसिद्धीस आला तो त्यांच्या चातुर्यामुळे आणि त्याची सैन्यबद्धता आणि त्याचा द्रुढविश्वास यामुळे.त्याच वेळेच नियोजन एवढं प्रगल्भ होतं की अर्ध्या पेक्षा जास्त लढाया त्याने वेळेच्या नियोजनावरच जिंकल्या,असं म्हणायला हरकत नाही.
वेळेचं नियोजन पद्धत
वेळेस वेळेच नियोजन दोन प्रकारे केलं .त्यातलाच पहिला प्रकार म्हणजे लढाई ठरलेल्या वेळेच्या आधी मैदानात जाऊन पाहणी करायची, सैन्याचं नियोजन लावायचं,आणि शत्रु मैदानात यायची वाट पाहात राहयची.यात त्याने स्वतःची कमकुवत बाजू बलवंत केली.यामुळे शत्रुंना स्वतःला सावरायला वेळ मिळत नसे व नेपोलियन विजय मिळवून घेत असे.
दुसरा प्रकार म्हणजे शत्रूच्या मानसिकता वबलवत्तर पणाला कमी करून विजय मिळवत असे,म्हणजे ठरलेल्या वेळेत शत्रू मैदानात हजर व्हायचा पण हे महाशय यायचेच नाही शत्रु वाट पाहता पाहता थकलेले असताना अचानक हल्ला करून नेपोलियन विजयी व्हायचा.
नेपोलियन विजयी होण्यामागे त्याचे सैन्य महत्वाची भूमिका बजावतात हे त्याला कळालं होतं त्यामुळे तो सैन्याला कधीही खचून जाऊ देत नव्हता. त्यांचं मनोबल वाढवून लढाईसाठी आणखी प्रव्रुत्त करत .
मानसिक बदल आणि विजयाचा नियम
एकदा नेपोलियन सैन्यासोबत भारताच्या दिशेने निघाला .पण त्याला सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे आ्ल्प्स या पर्वतांच्या रांगेची कारण त्या पर्वत रांगेला कुणीही पार करु शकलं नव्हतं हे नेपोलियनला माहिती होतं पण त्याला जग जिंकायचं होतं आणि काहीही करायला मागे येणारा नव्हता. सैनिक चालू लागले त्यांनी लोकांना विचारले असता लोक म्हणत जाऊ नका, ती पर्वत रांग भयानक आहे गेला तो परत आला नाही, वगैरे वगैरे...
पण याचं वेगळंच चालू, तो सैनिकांना म्हणाला की ही आल्प्स पर्वत रांग नाही आणि ती पर्वत रांग आलीच नाही आल्यानंतर मी तुम्हाला ती दाखवतो म्हणून पुढे जायला प्रव्रूत्त केलं सैन्य थकलेले असताना त्याने मनोबल खचून न जाऊं दिलं म्हणजे हाच खरा विजय होता. सैन्य पर्वत चढू लागले पाहता पाहता त्यांनी आल्प्स पार केला लोकांनी त्यांचं स्वागत केलं आणि ईतिहास घडला पहिल्यांदा आ्ल्प्स पार झाला.सैनिक विचारु लागले अजुन आल्प्स किती दुर आहे तर नेपोलियन हसून म्हणाला तो तर आपण कधिच पार केला.
शिकवण
सांगायचं म्हणजे दुर्दम्य ईच्छाशक्ती आणि मेहनत माणसाला कधिही विजयी करून देते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें