बुद्धीचा सदुपयोग करने का गरजेचे आहे।
मी एका कार्यक्रमात बोलताना समोर बसलेल्या बांधवांना विचारल, सर्वात हुशार प्राणी कोणता ? कुणीच बोलेना, नुसतेच एकमेकांकडे बघत राहीले. मग मी म्हंटल, तुम्हाला खात्री नाही का , माणूस हाच सर्वात हुशार प्राणी आहे ! इतक्यात एक चिमुकली उठली, म्हणाली नाही बाबा, माणूस नाही. मांजर सर्वात हुशार प्राणी आहे. मी विचारल कस काय ? तर म्हणाली मांजरी समोर प्लास्टीक, माती किंवा दगडाचा उंदीर ठेवला तर ती त्याच्याकडे ढुंकून पण बघत नाही. आणि माणूस बघा, स्वतःच देव बनवतो आणि स्वतःच हात जोडून त्या खोट्या देवाच्या समोर हात जोडून सुख, समृध्दी,संकट दूर करण्याची आणि लेकराबाळाची भीक मागतो.मी त्या मुलीला जवळ बोलवल आणि तीला विचारल , बाळा तुला हे कुणी सांगितल ?
YouTube link- IcoNikAkki
तर ती म्हणाली, व्हाॕट्सअॕपवर वाचल तेंव्हा कळल, पण बाळा व्हाॕट्सअॕपवर तर सगळेच अशा पोस्ट वाचतात. तुलाच हे का पटल ? तर म्हणाली मी हे करून पाहिल.आणि मी गाडगेबाबांचीही एक पोस्ट वाचली होती बाबा. जो देवळातला देव देवळात अंधार झाल्यावर लाईट लाऊ शकत नाही, जो देवळातला देव नैव्येद्यावर बसलेला कावळा किंवा कुत्र हाकलू शकत नाही, तो भक्तांच काय भल करणार ! बाबा हेच खर आहे. माणसा पेक्षा प्राणीच हुशार आहेत. आणि सर्वात मूर्ख माणूस आहे.
क्षणभर मला वाटल या मुलीचे पाय धरावे. कारण जे तीला या वयात कळल ते आमच्या शिक्षित उच्च शिक्षित बुळ्या बावळ्यांना नाही कलत.
याला म्हणतात मोबाईलचा सदुपयोग.
सत्यघटनेवर आधारित लेख।