गोष्ट त्रेतायुगातील आणि द्वापार युगातील
त्रेतायुग
वनात राहायचे ,जप तप करायचे काही काळानंतर त्यांना दुष्ट प्रव्रूत्ती त्रास द्यायला लागल्या,संत देवाचा धावा करु लागले, देवाकडे साकडे घालु लागले, त्यांना कळाले की भगवान श्री विष्णू यांचा अवतार मिनले जाणारे श्री राम यांनी अयोध्येत जन्म घेतला आहे व तेच या सर्वांपासून रक्षण करतील,पण येथे प्रश्न निर्माण झाला की श्री राम तर अयोध्येत आहेत त्यांना वनात कसे आणायचे सर्व मार्ग अवलंबले गेले पण किहीएक जमत नव्हते,मग काहिंना सुचले की आपण कानभरणी करून श्री रामचंद्र यांना वनात आणायचे, त्यांनी कौशल्या मातेला विनंती केली पण काहीच उपयोग झाला नाही.मग त्यातील एकाने सुचवले माता कैकयी यांनी दशरथ यांना युद्धकाळात रथाचे आख तुटली असताना आपल्या हाताने रथ सांभाळत विजय मिळून दिला. तेव्हा दशरथाने दोन वर मागण्यांसाठी सांगितले, तर कैकयीने वेळप्रसंगी मागेन म्हणून सांगितले तर संतांनी याच गोष्टी चा फायदा घेऊन श्री रामाला वनवासात जाण्यासाठी प्रव्रूत्त केले. श्री राम १४वर्ष वनवासात राहिले. श्री रामाने या काळात अनेक राक्षसाचा संहार केला आणि १४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अयोध्या नगरीत प्रवेश केला.
द्वापारयुग
तर द्वापार युगात श्री विष्णू क्रिष्ण अवतार धारण करून राक्षसाचा विनाश केला.माता देवकी व वासुदेव यांना आठव्या पुत्ररूपाने ते प्रकट झाले. तर येथे देवकी व वासुदेव यांना कंसाने१४ वर्षे तुरुंगात ठेवले होते. श्री क्रुष्ण तर भगवान होते त्यांनी कधीच त्यांना सोडवले असते पण कर्म पुर्ण होईपर्यंत फळ मिळत नाही.१४ वर्षानंतर कंसाचा वध करून भगवंताने देवकी व वासुदेव यांना तुरुंगवासातुन मुक्त केले. भगवंतांना विचारले असता त्यांनी त्रेतायुगात घडलेली घटना सांगितली आणि म्हणाले प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगाविच लागतात, म्हणून तुम्हाला या जन्मात कारागृहात राहावे लागले.